Shabri Aavas Yojana- शबरी घरकुल योजनेची नवीन यादी आली !

मित्रांनो 2023 आणि 2024 साठी राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांची शबरी घरकुल योजनेमध्ये पात्र पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. आणि यासंदर्भात शासनाने GR निर्गमित करून 34 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी शासन निर्णयमध्ये प्रसिद्ध केली आहे.

तर 2023-24 मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत, प्रति लाभार्थी किती अनुदान मिळणार आहे ही सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी आपण कोणकोणत्या 34 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी आली आहे आणि जिल्ह्यानुसार किती घरकुले मिळणार आहेत हे जाणून घेऊया, त्याच्यानंतर कोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत हे जाणून घेऊया.

शासन निर्णयमध्ये जी 34 जिल्ह्यांची यादी आली आहे त्यामध्ये नाशिक,अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा,सांगली,सोलापूर,उस्मानाबाद, जळगाव,नंदुरबार, धुळे,नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम,यवतमाळ, औरंगाबाद, जालना, लातूर,बीड,नागपूर, वर्धा,गोंदिया, भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली.

34 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी

नाशिक – 8000

अहमदनगर- 2000

ठाणे- 2000

पालघर- 4222

रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी- 2641

पुणे, कोल्हापूर, सातारा,सांगली- 1884

सोलापूर, उस्मानाबाद- 225

जळगाव- 5000

नंदुरबार- 24000

धुळे- 5709

नांदेड- 3000

हिंगोली, परभणी- 6000

अमरावती- 7906

अकोला, बुलढाणा,वाशीम- 2800

यवतमाळ- 4500

औरंगाबाद, जालना,लातूर, बीड- 7545

नागपूर- 5000

वर्धा- 500

गोंदिया- 1500

भंडारा- 1226

चंद्रपूर- 8666

गडचिरोली- 2775

असे एकूण 1 लाख 7 हजार 99 घरकुले लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, अथवा जे अनुसूचित जमातीचे लोकं कुडामातीच्या घरात,झोपडपट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी ही वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात आली आहे.

Leave a Comment